Friday, 4 April 2014

माझा नाविन्यपूर्ण उपक्रम



इंग्रजी विषय शिकवताना शब्द पाठांतर करणे आवश्यक असते,परंतु ब-याच वेळा शिक्षकाला कामाच्या व्यापामुळे विद्यार्थ्यांनी शब्द पाठांतर केले कि नाही ते पडताळून पाहता येत नाही,आणि शिक्षकाने फॉलो अप न घेतल्यामुळे विद्यार्थीही शब्द पाठांतराचा कंटाळा करतात,त्यामुळे मी हजेरी शब्दांची हा नवोपक्रम राबविला आहे.यासाठी प्रत्येकी ५ विद्यार्थ्यांचे गट तयार केले आहेत.सकाळी परीपाठापुर्वी सर्व विद्यार्थी गटामध्ये बसून एकमेकांना शब्द विचारतात,आणि त्याचा फॉलो अप घेण्यासाठी मी हजेरी घेताना विद्यार्थ्यांनी 'यस सर',किंवा 'हजर' असे न म्हणता एका शब्दाची स्पेलिंग अर्थ व उच्चार सांगावयाचा आहे.आणि विद्यार्थ्यांनी एकच शब्द पाठ करून येवू नये म्हणून अधूनमधून दुस-या शब्दाची खात्री करून घेतली जाते.यामुळे १०० टक्के विद्यार्थी शब्द पाठांतर करू लागले आणि याचा फायदा विषयाचे अध्यापन करताना झाला.हजेरी देताना शब्द सांगावयाचा असल्यामुळे विद्यार्थीही अत्यंत आनंदाने शब्द पाठ करू लागले,आणि त्यांच्यात एक निकोप स्पर्धा निर्माण झाली.


हजेरी घेताना,तसेच प्रत्यक्ष अध्यापन करताना विद्यार्थ्यांना शब्द विचारून मूल्यमापन केले.तसेच 'शब्द अंताक्षरी 'सारखे भाषिक खेळ घेवून विद्यार्थ्यांचा शब्द संग्रह तपासला.त्यामद्धे खूप वाढ झालेली दिसून आली.

1 comment:

  1. Sir khupch chan upkram aahe...
    Like it.
    New education system baby is now becoming mature ..
    Proud of you. .

    ReplyDelete