Sunday, 13 April 2014

मनोगत


" सा-या कोवळ्या जीवांना ,
अक्षराचा गंध यावा !
उजेडाच दान देण्या ,
झोपडीत सूर्य यावा !!!

            या उक्तीप्रमाणे काम करीत असणा-या सर्व शिक्षकांच्या कार्यातून आणि धडपडीतून महाराष्ट्रातील एक दर्जेदार आणि मॉडेल स्कूल म्हणून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा जामगाव नावारूपाला येत आहे .
                   गुणवत्ता ,शिस्त,आणि उपक्रम ही आमच्या शाळेच्या यशाची त्रिसूत्री आहे.आतापर्यंत आमच्या शाळेने अनेक वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेवून विविध स्तरावर पारितोषिके मिळविली आहेत .शाळेचे अनेक विद्यार्थी चौथी व सातवी शिष्यवृत्ती ,नवोदय प्रवेश परीक्षा मंथन स्पर्धा परीक्षा अशा विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले असून अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत.हे विद्यार्थी हीच आमच्या शाळेची खरी संपत्ती आहे.
                       सन २००७-०८ मद्धे आमच्या शाळेने 'सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम ' तसेच संत  गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत 'स्वच्छ व सुंदर शाळा' स्पर्धेत बीड जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला होता .तसेच सन २००८-०९ मद्धे औरंगाबाद विभागातून प्रथम तर महाराष्ट्रातून तृतीय येण्याचा बहुमान मिळविला होता.
                         यापुढील काळातही दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षणाच्या  माध्यमातून  गुणवंत विद्यार्थी घडविणे हेच शाळेचे व सर्व अध्यापकांचे ध्येय आहे.

No comments:

Post a Comment